Pimpri : सोहम सार्वजनिक ग्रंथालयात मतदान जनजागृती शपथ

एमपीसी न्यूज – संत तुकारामनगर येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयात मतदान जनजागृती शपथ शनिवारी (दि. 20) घेण्यात आली.

संस्थेचे सचिव प्रदीप बोरसे म्हणाले, “मतदान करणे आपला अधिकार असून हा हक्क आपण बजावलाच पाहिजे. उत्तम समाज आणि समृद्ध देश घडविण्यासाठी आपले मत योग्य उमेदवारालाच दिले नाही तर मग सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार उरत नाही तरी सर्वांना विनंती की आपण मतदानाचा हक्क बजावून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा” यावेळी मतदान जनजागृती शपथ देण्यात आली. वर्षा बोरसे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.