Pimpri : मतदार स्लीपचे वाटप अपूर्ण, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ नादुरुस्त त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ

एमपीसी न्यूज – निवडणूक आयोगाकडून मतदारांना वाटण्यात येणा-या स्लीपचे वाटप पूर्णपणे झाले नसल्याचे दिसून येत आहे. अनेक मतदारांपर्यंत स्लीप पोहचल्यात नाहीत. त्यामुळे कोणत्या बूथवर मतदान करायचे याचा मतदारांचा गोंधळ उडाला आहे. काल पाऊस असल्यामुळे स्लीप पोहोचविण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व्यवस्थितपणे काम करीत नसल्याचे निदर्शनास आले असून आपले मतदान नेमके कुठे आहे हे ऑनलाईन जाणून घेण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्र स्थलांतरित केली असल्याने देखील मतदारांचा गोंधळ उडत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही आणि मावळ विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. त्यामुळे स्लीपचे पुर्णपणे वाटप झाले नसल्याचे दिसून येते. अनेकांपर्यंत मतदान स्लीप मिळाली नाही. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला आहे.

अनेकदा मतदारांना आपला मतदार क्रमांक माहित नसतो, तर कोणत्या बूथवर मतदान करायचे, याची माहिती नसते. यामुळेच निवडणूक आयोगाकडून मतदारांना बूथ आणि मतदार क्रमांकाची माहिती आधीच घरपोच दिली जाते. परंतु, अनेक मतदारांना स्लीप मिळाल्या नाहीत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडत आहे. अनेक मतदान केंद्र स्थलांतरित केली आहेत. त्यामुळे देखील मतदारांचा गोंधळात भर पडत आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ सुरु होण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे मतदानाची आकडेवारी समजू शकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.