Pimpri : सोशल मिडियावर लहान मुलांचे अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरात आणखी चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी वाकड, चिखली आणि चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 6) बाललैंगिक अत्याचार प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात मागील एक महिन्यात एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

गुरुवार दाखल करण्यात आलेली पहिली घटना 29 एप्रिल 2019 रोजी वाकड येथे घडली. महेश सहानी याने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा स्वामी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना 5 मे 2019 रोजी चिखली येथे घडली. बालाराम दास याने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

तिसरी घटना 5 ऑगस्ट 2019 रोजी दावडमळा चाकण येथे घडली. किशोर भानुदास वाघमारे (वय 24, रा. दावडमळा, चाकण) याने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चौथी घटना 24 एप्रिल 2019 रोजी नाणेकरवाडी चाकण येथे घडली. अजय माताप्रसाद सागर (वय 25, रा. म्हेत्रेवाडी, चिखली) याने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार राजू राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

सोशल मीडियावर केंद्रीय स्तरावर काही संस्था आणि पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियाच्या ज्या अकाउंटवरून अश्लील व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभर सर्वत्र लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.