Pimpri: अभियंता दिनानिमित्त ‘वॉक फॉर गुड हेल्थ’

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका व महापालिका ज्युनिअर इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवारी)घोराडेश्वर डोंगर येथे ‘वॉक फॉर गुड हेल्थ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एव्हरेस्टवीर सागर पालकर, सुरेंद्र शेळके, श्रीकृष्ण कडूसकर, अमोल रंधवे, राहुल नांदुरके सहभागी झाले होते. तसेच 76 अभियंत्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला.

या वॉक फॉर गुड हेल्थ ची सुरूवात घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्यापासून सुरु झाली. सर्वजणांनी डोंगर सर केला. यासाठी ‘वेध सह्याद्रीचा’ या गिरीभ्रमण संस्थेचे मार्गदर्शन लाभले. तसेच पिंपरी महापालिकेच्या अभियंत्यांनी डोंगरावर स्वच्छता मोहिम राबविली. सुमारे 214 किलो प्लास्टिक गोळा करुन पर्यावरण संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, बापूसाहेब गायकवाड, दिलीप धुमाळ, चंद्रशेखर धानोरकर, संध्या वाघ, अनघा पाठक आदी सहभागी झाले होते.

उपअभियंता व बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, “आरोग्यासाठी चालणे अतिशय गरजेचे आहे. त्यासोबतच चालत-चालत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील आम्ही दिला आहे. पुढील वर्षी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण वीज मंडळ या संस्थेतील अभियंत्यांना सहभागी करून घेणेचा आमचा मानस आहे. त्यासाठी वेध सह्याद्रीचा या संस्थेचे गट प्रमुख सुरेंद्र शेळके हे समन्वयक म्हणून काम करण्यास तयार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like