Pimpri : प्रभाग समितीची निवडणूक होणार बिनविरोध

सर्व प्रभाग समित्यांमध्ये भाजपच्याच उमेदवारांचे अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज शहरातील आठही प्रभाग समित्यांसाठी भाजपच्या नगरसेवकांनी अर्ज भरले.
प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा गुरुवारी (दि. 9) होणार आहे. दरम्यान प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची आज (शनिवारी) शेवटची मुदत होती. या मुदतीत आठ प्रभाग समित्यांसाठी आठ नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. सर्व प्रभागात भाजपच्या नगरसेवकांनी अर्ज भरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेतील दरी पुन्हा निर्माण झाली आहे.

अ क्षेत्रिय कार्यालय – शर्मिला बाबर

ब क्षेत्रिय कार्यालय – करुणा चिंचवडे
क क्षेत्रिय कार्यालय – यशोदा बोइनवाड
ड क्षेत्रिय कार्यालय – शशिकांत कदम
इ क्षेत्रिय कार्यालय – सुवर्णा बुर्डे
फ क्षेत्रिय कार्यालय – योगीता नागरगोजे
ग क्षेत्रिय कार्यालय – अर्चना बारणे
ह क्षेत्रिय कार्यालय – अंबरनाथ कांबळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.