Pimpri: 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका- पालिकेचे आवाहन ; Warning of torrential rains with heavy rainfall between 3 to 6 August

एमपीसी न्यूज – भारतीय हवामान विभागाकडून 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान पुणे व परिसरामध्ये अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. जोरदार पाऊस पडत असल्यास शहरातील नागरिकांनी घरीच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहान पिंपरी पालिकेने केले आहे.

सोमवारपासून पिंपरी-चिंचवड शहरात पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाकडून 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान पुणे व परिसरामध्ये अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

जोरदार पाऊस पडत असल्यास नागरिकांनी घरीच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये.

पाण्यातील कोणत्याही विद्युत खांबाला, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रीकल डीपी बोर्डला स्पर्श करु नये. त्या जवळ जाणे कटाक्षाने टाळावे.

पादचारी भुयारीमार्ग (अंडरपास सबवे) तसेच पाणी साचलेल्या भागातून वाहनासह पायी, प्रवास टाळावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.