Pimpri: शहरवासीयांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार कायम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सुचविलेली भरमसाठ पाणीपट्टीवाढीचा विषय स्थायी समितीने दप्तरी दाखल करत महासभेकडे शिफारस केली होती. मात्र हा विषय दप्तरी दाखल करण्यासाठी मंजूर करण्याऐवजी महासभेने तहकूब केल्याने शहरवासीयांवार पाणीपट्टी वाढीचे संकट कायम आहे. दरम्यान, महासभेने पुढील सभेत विषय मंजूर केला. तर, पाणीपट्टीत वाढ होईल. विषय फेटाळला तर होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने पाणीपट्टीत वाढ करण्यास विरोधकांचा तीव्र विरोध आहे.

महापालिका प्रशासनाने करवाढ आणि पाणीपट्टीवाढ सुचविली होती. करवाढीवर 20 फेब्रुवारीपुर्वी निर्णय घेणे आवश्यक होते. पंरतु, भाजपने 20 फेब्रुवारीची सभा तहकूब केल्याने करवाढ लागू झाली आहे. तर, पाणीपट्टीचे शुल्क आकारले जात असल्याने पाणीपट्टी मागे घेता येईल. परंतु, बुधवारी झालेल्या महासभेत भाजपने पाणीपट्टीवाढीचा विषय तहकूब केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीपट्टी वाढीचे संकट कायम आहे.

असे आहेत पाणीपट्टीचे दर

सहा ते 15 हजार लीटरसाठी 8 रुपये पाणीपट्टी, 15 ते 20 हजार लीटरपर्यंत 40 रुपये, 20 हजार लीटरपुढील वापरासाठी 100 रुपये, व्यापारी पाणीवापरासाठीचा दर 55 रुपये प्रस्तावित केला होता. तर, खासगी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय, निमशासकीय कार्यालये. रेल्वे स्टेशन, ईएसईय हॉस्पिटल, ऑटो क्ल्स्टर, औंध उरो रुग्णालयांना प्रति हजार लीटरसाठी 17 रुपये, धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृध्दाश्रमांना 11 रुपये, स्टेडीयम 22 रुपये, महापालिका इमारती, मिळकतींना 11 रुपये, देहुरोड कँन्टोन्मेंट बोर्डासाठी प्रति हजार लिटरसाठी 11 रुपये दरवाढ प्रशासनाने सुचविली आहे. झोपडपट्टीसाठी 6001 ते 15 हजारसाठी 4 रुपये, 15001 ते 20 हजार लीटरसाठी 40 रुपये आणि 20 हजारच्या पुढील पाणीवापरणा-यांना 100 रुपये दर सुचविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like