Pimpri: सोमवारपासून पाणीकपात !

आठवड्यातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना येत्या सोमवारपासून (दि. 19 ऑगस्ट) पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पिंपरी -चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेमार्फत दररोज 480 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मागीलवर्षी लागू केलेली पाणीकपात रद्द करत 7 ऑगस्टपासून दरररोज पाणीपुरवठा सुरु केला होता. परंतु, पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. वाढती लोकसंख्या व त्यासाठी लागणारे नळ कनेक्शन यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सोमवारपासून आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांनी घरातील नळ, फ्लश, पाईपलाईन चांगल्या दर्जाचे वापरावेत. गळती होऊ नये याची दक्षता घ्यावी. घरातून बाहेर जाताना नळ बंद करावेत. टाक्या ओव्हरफ्लो होऊ देऊ नयेत. नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. गळतीबाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनला 8888006666 या मोबाईलवर कळविण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.