BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळेच पाणीकपात, पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागार हे संगनमत करुन वाढूव खर्च, मुदतवाढी, थेट पध्दतीने कामे, कामातील रिंग यामध्ये दंग आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांच्या निष्काळजीपणा आणि खाबुगिरीमुळेच शहरवासियांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

पवना धरण 100% भरले आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा सुरु केला. मात्र आठ दिवसाच्या आतच पुन्हा विभागनिहाय पाणीकपात सुरु केली आहे. पदाधिकारी, अधिकारी, ठेकेदार, सल्लागार हे संगनमत करुन वाढूव खर्च, मुदतवाडी, थेट पध्दतीने कामे, कामातील रिंग यामध्ये दंग आहेत. त्यामधून टक्केवारीचा मलीदा लाटण्याचे व्यसन लागल्यामुळे त्यांना शहराच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजनासाठी वेळ नाही. अशा अकार्यक्षम, कामचुकार, अधिका-यांमुळे व ठेकेदारांमुळे पाणी असून पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.

महापालिकेतील भाजपाचे अनेक पदाधिकारी प्रत्येक्ष अप्रत्यक्ष ठेकेदारीत गुंग असल्यामुळे त्यांचे या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष नाही. पाणी कपात कृत्रिम असून यामध्ये पदाधिकारी, अधिका-यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहे. अशा प्रकारची पाणी टंचाई निर्माण करुन त्या आडून टँकर लॉबी पोसण्याचा धंदा सत्ताधारी चालवीत आहेत, असा आरोपही भापकर यांनी केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like