Pimpri: पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पाणीकपात रद्द -राहुल जाधव

एमपीसी न्यूज – पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड सुरु असलेली पाणी कपात रद्द करण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी आज (गुरुवारी) सांगितले. तसेच एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने सर्वांना पुरेशे आणि समाधानकारक पाणी मिळत आहे, असेही ते म्हणाले.

महापौर जाधव म्हणाले, मागील वर्षी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने फेब्रुवारीपासून शहरात आठवड्यातून विभागनिहाय एकदा पाणीकपात सुरू केली होती. तरी, देखील पाण्याच्या तक्रारी कमी होत नसल्याने मार्चपासून दिवसाआड पाणीकपात लागू करण्यात आली. सध्या दररोज 410 एमएलडी पाणी रावेत बंधारातून उचलले जात आहे.

  • धरण पाणलोट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण 85 टक्के भरले आहे. धरण परिसरात पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे लवकरच धरण 100 टक्के भरेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर दिवसाआड पाणी कपात रद्दचा निर्णय घेतला जाईल.

दिवसाआड पाणीकपातीमुळे सर्वांना पुरेशे पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या तक्रारी कमी झाल्या आहेत, असे सांगत महापौर जाधव म्हणाले, 100 टक्के धरण भरल्यानंतर पवना माईचे जलपूजन केले जाईल. त्यानंतर पाणीकपात मागे घेतली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.