Pimpri: बीआरटीच्या थांब्यावर उभारणार पाणपोई आणि स्वच्छतागृह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या बीआरटीच्या थांब्यांवर सुलभ स्वच्छतागृह व पाणपोईची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेतर्फे नाशिक फाटा ते वाकड, औंध ते रावेत आणि दापोडी ते निगडी हे 3 रेनबो बीआरटीएस मार्ग विकसित करण्यात आले आहेत. त्यावर पीएमपीएलच्या वतीने बस सेवा सुरू आहे. तर, काळेवाडी फाटा ते चिखलीचा देहू-आळंदी रस्ता आणि बोपखेल फाटा ते आळंदी रस्ता हा बीआरटी मार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे.

बीआरटी थांब्यावर सुलभ स्वच्छतागृह व पाणपोईची सुविधा विकसित केली जाणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.