Pimpri Water leak Problem : आयुक्तसाहेब 40 टक्के पाणी गळतीकडे लक्ष द्या; शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला (Pimpri Water leak Problem) मागील दोन वर्षापासून प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असताना आणि 100 टक्के पवना धरण भरलेले असताना सुद्धा प्रशासनाकडून दिवसाआड पाणीपुरवठा का केला जात आहे? धरणातून दररोज 500 एमएलडी पाणी उचलले जात असून शहरवासीयांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत त्यातील 40 टक्के पाण्याची गळती झालेली असते. त्यामुळे आयुक्तसाहेब अगोदर 40 टक्के पाणी गळतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी महिला संघटिका सरिता साने,  निलेश हाके, निखिल येवले, बशीर सुतार, रवींद्र ब्रम्हे, निलेश तरस, राजेंद्र अडसूळ, प्रशांत कडलक, उमेश रजपूत, नरेश टेकाडे, माऊली जगताप,  अंकुश कोळेकर प्रदिप दळवी, सुनील पाटील,  तुषार दहीते, मलिक मुजावर, शुभम भदाणे, रुपेश हिरे, शैला पाचपुते, शैला निकम उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा. या दृष्टिकोनातून महापालिकेकडून स्काडा प्रकल्प राबविण्यात आला. पाणीचोरीवर आळा बसविण्यासाठी कोट्यावधी खर्च करत सर्व सोसायट्यांमधे पाणीमीटर बसविण्यात आले. 24×7 पाणी हि योजना करीत कोट्यावधी (Pimpri Water leak Problem) रूपये खर्च केले.

World Bamboo Day : जागतिक बांबू दिनानिमीत्त पुण्यात ‘चक्र’ बांबूच्या अनोख्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

नवीन पाईप लाईन टाकल्या, परंतु पाणीपुरवठा विभाग व प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे सर्व योजना फसल्या व नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून मुकावे लागले. टँकर लाॅबी आजही कार्यरत आहे. नागरिकांचे हक्काचे पाणी पळविले जात आहे.

महापालिकेच्या वतीने विविध योजना व नवनवीन प्रकल्प राबविण्यात आले. परंतु, पाणीपुरवठा व प्रशासनाच्या चुकीच्या व ढिसाळ कारभारामुळे अजूनही शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या प्रकरणी जातीने लक्ष घालून गोरगरीब सामान्य नागरिकांना हक्काचे पाणी मिळवून द्यावे. दररोज पाणीपुरवठा करावा. त्याचबरोबर  40 टक्के होणारी पाणी गळती थांबवावी. प्रशासनाकडून जाणूनबूजून पाणी गळती केली जाते. याचा तपास लावावा तसेच पाणी गळती होते कि केली जाते याचा शोध घेऊन नक्की पाणी कोठे मुरते याचा शोध घ्यावा व संबंधितावर कारवाई करण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.