Pimpri : नवीन वर्षाची सुरवात तरुणाई करणार पाणी बचतीतून

रावेत येथील भोंडवे एम्पायर सोसायटी करणार रोज 10 हजार लिटर पाण्याची बचत

एमपीसी न्यूज – पाणी ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस पाण्याचा दुष्काळ वाढतच आहे. नजीकच्या काळात एकदिवसाड पाणी येईल. असे सुरु असताना परिस्थितीची जाण ठेवुन भोंडवे एम्पायर सोसायटी रावेत येथिल तरुणांनी एकत्र येऊन पाणी वाचविण्यासाठी नळांना एरेटर बसविले आहेत.

सोसायटी मध्ये पाणी बचतीचे महत्व, उपाय आणि आपली जबाबदारी ह्या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सदस्यांनी घेऊन नागरिकांचे गणेशोत्सव काळात प्रबोधन करून पवनानदी स्वछतेसाठी पाणी बचतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भोंडवे एम्पायर मधील रहिवाशांनी पाणी बचतीसाठी हे पाऊल उचलले.कामवाली बाई भांडी धुणे करताना किंवा घरातील लहान मुलं ब्रश करताना बरेच वेळा पाण्याचा नळ सुरुच रहातो आणि भरपुर प्रमाणात पाणी वाया जाते. पाणी वाया जाऊ नये म्हणुन घरात येणाऱ्या पाण्याचा नळ अर्धा बंद केला तर पाण्याचा दाब कमी होतो. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाणी वाचवणारे एरेटर्स बसविले आहेत. आत्ताच्या नळातुन मिनिटाला 12 लीटर पाणी येत असे तर अश्याप्रकारच्या एरेटर बसविल्यानंतर मिनिटाला 3 लीटर पाणी येते आहे. दिवसभरात एका घरात किमान 100 लीटर पाणी वाचवले जाईल.तब्बल 200 नळांना पाणी बचतीसाठी बसवून हजारो लिटर पाणी बचतीची सुरवात नववर्षाच्या पूर्वसंध्येला करून भोंडवे एम्पायर मधील रहिवाशांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

या कारणामुळे पाण्याचा वापर कमी होणार धरणसाठ्यात ते पाणी भविष्यातील तरतूदी साठी  शिल्लक राहील सोसायटीला रोजच्या पाणी  प्रेसिडेंट वर चढवण्याच्या विज बिलात बचत तसेच  वापरून तयार होणारे  सांडपाणी देखील नदीत कमी प्रमाणात येईल असे अनेक  फायदे प्रत्येक  कुटुंबाला होऊ शकतात.ह्यासाठी सोसायटीचे चेयरमन दयानंद पागम, इशा सराफ,  तेजस देशपांडे आणि सोसायटी कमिटीच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.

पवना नदी स्वछता अभियाना अंतर्गत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून पाणी बचतीचे उपाय, गरज आणि आपली जबाबदारी ह्यावर शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प राबवण्यात येतात या पुर्वी सेलेस्टिएल सिटी येथे 800 प्लॅट धारकांनी हे वाॅटर एरेटाॅर  बसवून समाधानाने वापरत आहेत. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी मार्फत याचे प्रबोधन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल . यासाठी शहरातील सोसायटीचे चेअरमनने किंवा इतरांनी खालील क्रमांक वर संपर्क करावा 8888870703 असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे डायरेक्टर रोटरी गणेश बोरा  यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.