Pimpri : पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोतांची स्वच्छता करावी, संभाव्य पुराचा धोका ओळखून इतर कामे उरकून घ्यावी – विकास पाटील

एमपीसी न्यूज – पावसाळा पूर्व जल स्त्रोत्रांची काळजी व संभाव्य पुराचा धोका ओळखून शहरातील पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक कामे उरकून घ्यावी, अशी मागणी इसिएकडून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत पर्यावरण तज्ञ व इसिए चेअरमन विकास पाटील म्हणतात, पावसाळा पूर्व कामे व्यवस्थित न होणे.सर्व ओढे, नाले, नदी पात्र यामधून बांधकामाचा राडारोडा न काढणे, त्यांची स्वच्छता न ठेवणे.

शहरातील सर्व जलस्त्रोतां मध्ये अतिक्रमण झाल्या मुळे, त्यांची रुंदी तसेच खोली कमी झालेली आहे. या सर्वामुळे या ओढे, नाले तसेच नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे त्यामुळे सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की पाणी पात्राबाहेर वाहू लागते व एकदम पुर येतो.

पाटील पुढे म्हणतात, शहरातील पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारीची यंत्रणा व्यवस्थित साफ न केल्याने ओढ्या सारखीच त्यांची अवस्था होऊन पाणी रस्त्यावर वाहू लागते, तसेच रस्त्याच्या आजबाजूला असलेल्या इमारतीच्या छतावरील पावसाचे पाणी पण रस्त्यावर येते व ते साचून पुराचा धोका आणखी वाढतो. या वर्षीचा पावसाळा कांहीं आठवड्यावर पोहचला आहे.

वेधशाळेच्या अंदाजानुसार या वर्षीचा पाऊस पण चांगला पडण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या महामारी मुळे जलस्त्रोत सफाईचे तसेच ‘स्टॉर्म वॉटर ड्रेन’ सफाईचे अजून सुरू झालेले नाही. गेल्या वर्षीच्या पुरावर उपाय करणारी कोणतीही कामे अजून पुरी झालेली नाहीत, म्हणजे याही वर्षी पुराचा धोका येऊ शकतो.

शहरातील सर्व ओढे, नाले अशा जलस्त्रोतांचे वॉर्ड प्रमाणे ऑडिट करून, सर्व कामांची नोंदणी केली पाहिजे. तसेच त्या भागातील जनतेचा पण सहभाग आवश्यक करून घ्यावा, अशी सूचना इसिएचे विकास पाटील यांनी महापालिकेला केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.