BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: दापोडी, सांगवीतील पाणीपुरवठा विस्कळीत 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरीतील जलवाहिनी नादुरूस्त झाल्याने आज (मंगळवार)चा दापोडी, सांगवी, पिंपळेगुरव भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तसेच उद्या (बुधवारी)देखील सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले. 

दोनच दिवसांपूर्वी कासारवाडी मधील वाहिनी नादुरूस्त झाल्याने सांगवी, नवी सांगवी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतर पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयाजवळील जलवाहिनी फुटली. पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर झाल्याने सकाळपासून या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला होता.

दिवसभर दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे सांगवी, दापोडी भागातील टाक्या भरल्या नाहीत. दुरूस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तसेच बुधवारी सकाळी पिंपळेगुरव, वैदुवस्ती, सुदर्शननगर, दापोडी, सांगवी, नवी सांगवी भागात कमी दाबाने किंवा पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.