Pimpri: पिंपरी, सांगवी, पिंपळेगुरव, रहाटणीचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – पिंपरीगाव येथील नवीन उंच टाकीला इनलेट कनेकशन देण्याचे कालपासून सुरू असलेले काम अजूनही काही तांत्रिक कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या भागांना आज (शुक्रवारी) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
– भाटनगर
-पिंपरी कॅम्प
– पिंपरी गाव
– पिंपळे सौदागर गावठाण टाकीवरील भाग
– रहाटणी गावठाणचा भाग
– वैदू वस्ती, सुदर्शन नगर
– पिंपळे गुरव
– कासारवाडी ( गेटाखालचा भाग)
– नवी सांगवी
– जुनी सांगवी
– दापोडी.

पिंपरीगाव येथील उपरोक्त काम पूर्ण झाल्यावर या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like