Pimpri: शहराच्या ‘या’ भागांतील पाणीपुरवठा उद्या राहणार विस्कळीत

Pimpri: Water supply in 'these' areas of the city will be disrupted tomorrow रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाबनलिकेतून पाण्याची गळती होत आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी उद्या (गुरुवारी) सकाळी दहानंतर पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाबनलिकेतून पाण्याची गळती होत आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी उद्या (गुरुवारी) सकाळी दहानंतर पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवड भागातील
संध्याकाळचा पाणीपुरवठा उशिराने, कमी दाबाने व विस्कळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

पालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाबनलिकेतून पाण्याची गळती होत आहे. या गळतीची दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी सकाळी दहानंतर टप्पा क्रमांक दोनच्या उच्च दाबनलिकेचे पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवड, बिजलीनगर, पिंपरीनगर, पिंपरीगाव, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी या भागातील उद्या संध्याकाळचा पाणीपुरवठा उशिराने, कमी दाबाने व विस्कळीत होईल.

गळतीची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकानी उपलब्ध पाणी जपून वापरावे असे आवाहन महापलिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.