Pimpri: पाणीकपात कायम, बुधवारी होणार अंतिम निर्णय; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

उद्यापासून पाणीकपात रद्द; 430 एमएलडीऐवजी 480 एमएलडी पाणी उचलणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा बुधवारपर्यंत कायम राहणार आहे. बुधवारी (दि.7) एकदिवसाआड पाणी कपात रद्द करण्याबाबत फेरविचार केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) दिली. तसेच उद्यापासून पाणीकपात रद्द केली जाणार असून 430 एमएलडीऐवजी 480 एमएलडी पाणी नदी पात्रातून उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गटनेते आणि अधिकाऱ्यांनी आज पाण्याचा आढावा घेतला. या बैठकीत पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पिंपरी महापालिकेने 1 मार्च 2019 पासून विभागनिहाय एकदिवसाआड पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतरही पाण्याच्या तक्रारी येत असल्याने त्यामध्ये वाढ करत 6 मे पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पाणी उचलण्याचा कोटा केवळ 415 एमएलडी आहे. त्यापुढील पाणी दंड भरून उचलावे लागते. मे महिन्यात पाणी जास्त लागते. त्यामुळे कोटा शिल्लक राहण्यासाठी आता जास्त पाणी उचलत नसल्याचे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, उद्यापासून 430 एमएलडीऐवजी 480 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. परंतू, पाणीपुरवठा एकदिवसाआडच सुरू ठेवण्यात येणार आहे.

एक दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने पाण्याच्या तक्रारी कमी येत आहेत. ज्या भागात कमी दाबाने पाणी येते, त्या भागात देखील पुरेसे पाणी येते. ज्यांच्याकडे पाणी साठवण क्षमता नाही, त्याच भागातून केवळ पाण्याच्या तक्रारी येत आहे. पाणी जास्त उचलून पाणीपुरवठा सुरळीत होत आहे का?, कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत आहे का? हे पाहून पाणीकपात रद्द करण्याबाबत बुधवारी फेरविचार केला जाईल.

  • पाऊस सुरू असल्याने अनेक सोसाट्यामधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही त्यांना पंपातून पाणी उचलता येत नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्ये धरण भरले होते. परंतु, परतीच्या पावसाने दडी मारली. त्यामुळे यंदा पाणीकपात जास्त करावी लागली. महापालिकेसाठी पाणी उचलण्याचा कोटा केवळ 415 एमएलडी आहे. त्यामुळे नदीत पाणी आहे, म्हणून जास्त पाणी उचलत नाही. उन्हाळ्यात जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी आता जास्त पाणी उचलत नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.