Pimpri: मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वारक-यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारक-यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यातील दिंड्यांसाठी चार पाण्याचे टँकर देण्यात येत आहेत. हे टँकर संपूर्ण पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणीपुरवठा करणार आहेत, अशी माहिती मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.

ट्रस्टतर्फे टँकरचे पूजन करून वारक-यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प.पू.श्री. रामकृष्ण प्रासादिक दिंडी क्र. 221, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ह. भ. प. सोपानकाका कराडकर दिंडी क्र 11 आणि ह.भ.प. मठाधिपती मुक्‍ताबाई महाराज बेलगावकर दिंडी क्र. 59 अशा चार दिंड्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.

  • पुणे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे, ह.भ.प. माऊली कोकाटे महाराज, दत्त सेवा आश्रमाचे ह.भ.प. शिवानंद महाराज, ह.भ.प. तांदळे महाराज, ह.भ.प.काळे महाराज, शिव कीर्तनकार इतिहासकार डॉ. गजानन व्हावळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य जगन्नाथ नाटक पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सूर्यकांत वाघमारे, ह.भ.प. तुकाराम महाराज, सेवानिवृत्त वनपरिमंडल अधिकारी रमेश जाधव, विश्व हिंदु परिषद पश्चिम महा.प्रांत सेवा प्रमुख दादा ढव्हाणे, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, मानवी हक्क संरक्षण समितीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांच्या हस्ते टँकरचे पूजन करून टँकर रवाना करण्यात आले.

अरुण पवार म्हणाले, वारक-यांना वारीत पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यंदा तर दुष्काळी परिस्थिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारक-यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.