Pimpri : डिव्हायडरमध्ये लावलेल्या झाडांना एक दिवसआड तरी पाणी द्या -गणेश आहेर

एमपीसी न्यूज – बाहेर ऊनाचा तडका वाढत असल्यामुळे झाडे व इतर वनस्पतींना पुरेसे पाणी मिळत नाही आहे. त्यामध्ये डिव्हायडरमध्ये लावलेली फुलझाडे व शोभिवंत झाडे सुद्धा पाण्याअभावी सूकून चालली आहेत. पाण्याअभावी व प्रचंड उन्हाच्या तडाख्यामुळे सूकून चाललेल्या या झाडांना महापालिकेने एक दिवसआड करून तरी पाणी द्यावे, अशी मागणी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली आहे.

गणेश आहेर म्हणतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्यामुळे ह्या वर्षी माञ उन्हाळ्याचा महिना सूरू होऊन सुद्धा महापालिका उद्यान विभाग झाडांना पाणी घालत नसल्यांने पाण्याअभावी झाडे सूकून चालली आहेत.

पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे ही झाडे सूकून जात आहेत. त्यामुळे पालिकेने टँकरच्या मदतीने एक दिवसआड तरी या झाडांना पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्यासहित गोरख पाटील, गणेश पाडूळे यांनी ही मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.