Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे जलशुध्दीकरण प्रकल्पाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन तर्फे पिंपरीतील वसंतदादा पाटील शाळा आणि जिल्हा परिषद स्कूल वाघजाई नगर येथे जलशुध्दीकरण प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेतला.

या दोन्ही शाळेत जलशुध्दीकरण प्रकल्प राबविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष रो. सदाशिव काळे तसेच प्रकल्प अधिकारी रो. संतोष भालेकर, सुवर्णा काळे, शाळेचे संस्थापक हनुमंत भोसले, मुख्याध्यापिका, विद्यार्थी, इतर शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळा वाघजाई नगर येथे शाळेचे आधारस्तंभ बाळासाहेब शिळवणे, दत्तात्रय शिळवणे, पांडुरंग शिळवणे, गोविंद राऊत, मुख्याध्यापिका , इतर शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

  • या उपक्रमाची माहिती देताना रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे म्हणाले की, जलशुध्दीकरण प्रकल्पामुळे शाळेतील 1400 विद्यार्थअयांना शुध्द पाणी पिण्याकरीता मिळणार आहे. या दृष्टीने या प्लॅंटची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असणे हे फार महत्वाचे आहे. अशुध्द पाण्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. नवीन पिढी ही सुदृढ असण्यासाठी शुध्द पाणी आवश्यक आहे. या शुध्द पाण्याची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्यावतीने करण्यात आली. जलशुध्दीकरण प्रकल्प राबविताना विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यांसमोर ठेवून हा प्रकल्प हाती घेतला आहे.

कार्यक्रमाचे आभार रो. संतोष भालेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.