Pimpri : वायसीएम रुग्णालयातील पाण्याची नासाडी थांबवावी – युवराज दाखले

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून, कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात पाणी टंचाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, वायसीएम रुग्णालयात ठिकठिकाणी पाणी वाया जात असल्यामुळे, सामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालय व परिसरात होणारी पाण्याची नासाडी न थांबल्यास, शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने शिवसेना स्टाईलने पाणीपुरवठा प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा देण्यात आला आहे. व या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी महापालिका आयुक्त व प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.