Pimpri: निरोगी, हरित, राहण्यायोग्य अन्‌ पर्यावरणपूरक शहर निर्माण करणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पारदर्शी, गतीमान नागरिक केंद्रीत महापालिका स्थापन करणे, निरोगी आणि हरीत, पर्यावरणपूरक शहर निर्माण करणे, जागतिक दर्जाचे एकात्मिक आणि सुलभ, सुरक्षित वाहतूक असणारे, राहण्यायोग्य शहर निर्मिती, शाश्वत आणि आर्थिक विकास करण्यावर भर दिला जाणार असल्याचे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  • नवीन योजनांचा भडीमार करण्यापेक्षा भविष्यकालीन, दीर्घकालीन परिणाम दाखविणा-या योजनांचे नियोजन केले असल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराचा सर्वांगिण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करण्यासाठी विकास धोरणात समाविष्ट करणे, शहर विकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे, चिरस्थायी पर्यावरणपुरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे या चतुश्रृतीचा अवलंब केला जाणार आहे.

पारदर्शी, गतीमान आणि नागरिक केंद्रीत महापालिका स्थापन करणे, जीआयएस आधारित ‘ईआरपी’चा वापर सुरु करणे, कॅशलेस पेमेंटकरिता सुविधा निर्माण करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट पाणीपुरवठा, स्मार्ट मलनि:सारण, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट मोबिलीटी, स्मार्ट शिक्षण आणि स्मार्ट आरोग्य सुविधा इत्यादी योजनांचा वापर करणे यावर भर दिला जाणार आहे.

  • तसेच ग्रीन बिल्डींग रेटींग सिस्टीम निर्माण करणे, पर्यावरणपूरक सोसायट्या निर्माण व्हाव्या याकरिता स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांना करात सूट देणे, नागरवस्ती विभाग व समाजकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून थेट खात्यात लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

गतीमान प्रशासनावर भर!
पारदर्शी, गतीमान व नागरिक केंद्रीत महापालिका स्थापन करण्यात येणार असून जीआयएस आधारित ईआरपी चा वापर सुरु करणे, कॅशलेस पेमेंट करिता सुविधा निर्माण करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट पाणीपुरवठा, स्मार्ट मलनि:सारण, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट मोबिलीटी, स्मार्ट शिक्षण आणि स्मार्ट आरोग्य सुविधा इत्यादी योजनांचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे,

  • कंट्रोल कमांड सेंटर!
    ग्रीन बिल्डींग रेटींग सिस्टीम निर्माण करणे, पर्यावरणपूरक सोसायट्या निर्माण व्हाव्या याकरिता स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांना करात सूट देणे, नागरवस्ती विभाग व समाजकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून थेट खात्यात लाभ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने परिणामकारक योजना राबविण्यावर भर दिला आहे. सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर करुन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इंटिग्रेटेड कंमांड अ‍ॅ़ण्ड कंट्रोल सेंटर स्थापन करणे, बेवारस पडलेल्या वाहनांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.