Pimpri: मास्क घाला, रस्त्यावर थुंकू नका; अन्यथा 500 किंवा हजार रुपयांचा दंड

Pimpri: Wear a mask, do not spit on the street; Otherwise a fine of Rs.500 or 1000 rupees दंडाची वसूल केलेली रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करावी असे आदेशात म्हटले आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर आता थडक कारवाई केली जाणार आहे. मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणा-यांकडून 500 किंवा 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काढला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-या नागरिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 500 रुपये दंडाची कारवाई केली जात होती. मात्र, दंडाची रक्कम जास्त असल्याने स्थायी समिती सभेने 3 जून रोजी दंडाची रक्कम 500 ऐवजी 200 रुपये आकारावा, असा ठराव मंजूर केला.

त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मास्क न वापरणा-यांकडून 200 रुपये दंड वसूल केला जात होता.

राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत विविध सुविधा दिल्या आहेत. लॉकडाउन शिथिल केला आहे. सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासात असताना चेह-यावर मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

सार्वजनिक स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे.

त्यापार्श्वभुमीवर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश काढला आहे.

मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणे, थांबणे, गाडी चालवत असताना निदर्शनास आल्यास आणि सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन किंवा त्याशिवायही थुंकल्यास अशा व्यक्तींकडून 500 किंवा 1000 रुपये दंड आकारण्यात यावा आहे. त्याबाबत तात्काळ कारवाई करावी.

दंडाची वसूल केलेली रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करावी असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या सुमारे चारशे जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.