Pimpri: पावसाळ्यात दोन मास्क जवळ बाळगा, हात वारंवार सॅनिटाईज्ड करा, आयुक्त हर्डीकर यांचे आवाहन

precaution to be taken regarding coronavirus in rainy season PCMC Commissioner.shravan Hardikar, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू झाल्याने आता साथीचे रोगही तोंड वर काढणार आहेत.

एमपीसी न्यूज- कोरोनाचे संकट संपले नाही. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कार्यालयाला जात असताना मास्क ओला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने कार्यालयात जात असताना एक जादा मास्क स्वत:जवळ ठेवावा. हँड सॅनिटाईज्ड व्यवस्थित आणि वारंवार चालू ठेवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

तसेच पावसाळा सुरू झाला असून डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू हे आजार पसरतील. त्यासाठी महापालिकेकडून धुरीकरण, औषध वाटप, जनजागृती अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व्हिलन्स वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू झाल्याने आता साथीचे रोगही तोंड वर काढणार आहेत.

त्यामुळे नागरिकांना आता दुहेरी संकटाचा सामना करायचा आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, पावसाळ्यात नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येकाने कार्यालयात जात असताना एक जादा मास्क स्वत:जवळ ठेवावा. पावसाळ्यात कार्यालयाला जात असताना मास्क ओला होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोरडा मास्क बाळगण्याची आवश्यकता आहे. हँड सॅनिटाईझेशन व्यवस्थित आणि वारंवार चालू ठेवावे. यामुळे अन्य आजारांपासून पण बचाव करु शकतो.

सुरक्षित अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. डेंगू होऊ नये यासाठी सर्व्हिलन्स वाढवायचे आहे. धुरीकरण देखील केले जाणार आहे. तशा सूचना संबंधीत विभागाला दिल्या आहेत.

आता पावसाळ्यातील साथीच्या आजाराचाही सामना करावा लागणार आहे. पावसाळा सुरू झाला असून डेंग्यू, मलेरिया अशा आजारांची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वाईन फ्ल्यू पण चालू होईल. त्यासाठी महापालिकेकडून धुरीकरण, औषध वाटप, जनजागृती आशा उपाययोजना करण्यात येत आहेत. या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त खबरदारी बाळगावी.

त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी गरम पाण्याने मिठाच्या गुळण्या कराव्यात. त्यामुळे अनेक फ्ल्यु होण्याला आपण रोखू शकतो. त्यासाठी एवढी खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

जून अखेर 2500 कोरोनाबाधित रुग्ण होण्याची शक्यता!

पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी 10 ते 11 दिवस लागत आहेत. त्यानुसार महिनाअखेरपर्यंत रुग्ण संख्या साधारणत: 2500 पर्यंत जावू शकेल असा अंदाज आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.

तसेच, हा सर्वांचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे पावसाळ्यात रुग्ण वाढ होते की नाही हे सांगता येत नाही. पण, पावसाळ्यात दुसरा फ्ल्यु वाढतो. त्यामुळे त्या फ्ल्युचे करोनाच्या विषाणू बरोबर काय इंटरॅक्ट करतात . ते बघायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.