Pimpri : शिवाजीराव आढळराव पाटील यांचे वाडा गावात प्रचारादरम्यान स्वागत

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील प्रचार दौ-या निमित्त वाडा येथे भेट दिली. या दौ-यानिमित्त नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार सुरेश गोरे, अशोक खांडेभराड, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेटे, दिलीप मेदगे, सेनेचे जिल्हा अध्यक्ष राम गावडे, विजया शिंदे, शिवाजी वरपे, जिल्हा दूध संघाचे संचालक चंद्रशेखर शेटे, पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, उद्योजक संजय घनवट, रामदास धनवटे, गणेश सांडभोर, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, नंदा कड, संतोष डोळस, राजेंद्र गायकवाड, कैलास गोपाळे आदी उपस्थित होते.
  • शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचारात रंगत वाढली आहे. भोरगिरी, टोकावडे, मंदोशी, धुवोली, खरोशी येथे गावभेट दौरा झाला. खासदार आढळराव पाटील म्हणाले, “राज्यात कोठेही बैलगाडा शर्यतीचा विषय निघाल्यावर सर्वप्रथम माझे नाव घेतात. कारण त्यासाठी सगळ्यांत जास्त प्रयत्न मी केलाय, पुणे-नाशिक लोहमार्ग फक्त चार वर्षात सुरु होऊन दोन तासांत नाशिकला जाता येणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.