Pimpri : विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून घडली वारकरी सेवा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था, शाळा, सामाजिक संघटना यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्याबरोबर आलेल्या वारक-यांची मनोभावे सेवा केली. अन्नदान, फराळवाटप आदी उपक्रम हाती घेण्यात आले.

शिवसेना शाखा फुगेवाडी व युवासेना पिंपरी विधानसभाच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, युवा सेना अधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, विभाग प्रमुख राजेश भाऊ वाबळे, सनी कड, रवी नगरकर, अजित बोराडे, गोपाळ मोरे, प्रमोद गायकवाड, सुनील कदम, दत्ता कांबळे, जीवा हाके,राहुल पलांडे, विनय खमगळ ओंकार जगदाळे, राहुल राठोड, अकील शेख शिव सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन उपविभाग प्रमुख एकनाथ हाके यांनी केले होते.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून आलेल्या वारकर्‍यांना सहा हजार फळे व वडापावचे वाटप करण्यात आले. प्रतिभा महाविद्यालयाचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. क्षितीजा गांधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरविंद बोरगे, प्रा. नंव्या दंडवाणी, कर्मचारी समन्वयक संदीप शहा, विद्यार्थी तन्वी वैद्य, अर्चना चौधरी, कल्याणी गोठे, निखील महाजन, ओमकार माडगो, मंदार हरीप, योगेश भगत, विधीत हिरवे, कैवल्य बावडेकर, शुभम खनका, श्रीधर कुंभार, शुभम भोईटे, कर्मचारी कमल सोनार, दीपक सोनार, बहाद्दूर सोनार, विनीत खरात, राकेश निर्मलकर आदींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

निगडी येथील द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने “साथ चल” उपक्रमा अंतर्गत 900 पेक्षा जास्त सभासद व विद्यार्थ्यांनी “आई- वडिलांचा आजन्म सांभाळ करेन ” अशी प्रतिज्ञा घेतली. सर्व सभासदांना व विद्यार्थींना पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती यांनी शपथ दिली. या कार्यक्रमास शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती , उपाध्यक्षा सीए सिमरन लिलवानी , सचिव सीए पंकज पाटणी तसेच सीए विजयकुमार बामणे ,सीए शैलेश बोरे, सीए सुहास गार्डि आणि 100 पेक्षा जास्त विध्यार्थी उपस्थित होते. तसेच शाखेचा वतीने वारकऱ्यांना वेदना निवारक मलम चे वाटप करण्यात आले . सीए विद्यार्थ्यांनी जकात नका परिसरातून सीए दिंडी काढली.

काका इंटरनॅशनल स्कुल राहटणी तापकीरनगर येथील नर्सरी ते पाचवीपर्यंत मुलांची दिंडी यात्रा काढण्यात आली. त्यामध्ये लहान मुलांनी तुकाराम महाराज मुक्ताबाई यांची वेशभूषा केली होती. सर्व लहानमुले वारकरी होऊन दिंडी मध्ये सहभागी झाले होते, दिंडीचे नियोजन स्कुलचे मुख्य प्रशांत रेड्डी , उप- मुख्यध्यापिका वंदना, स्कुलचे संस्थापक नवीन तापकीर यांनी केले. त्यावेळी स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना तापकीर, चिराग फुलसुंदर गणेश भोसले व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले.

पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पालखी सोहळ्यातील दिंड्यांसाठी पाण्याचे चार टॅंकर देण्यात येत आहेत. हे टॅंकर संपूर्ण पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करणार आहेत, अशी माहिती मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच व साहित्य संवर्धन समिती आयोजित देहू ते आकुर्डी या दरम्यान साहित्य प्रबोधन दिंडी काढण्यात आली. साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, नवयुग साहित्य मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव , पिं. चिं. साहित्य मंचचे अध्यक्ष राजेंद्र घावटे, जेष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील , समरसता साहित्य मंचच्या अध्यक्षा शोभा जोशी सहभागी झाले होते. दिंडीची सुरुवात तुकाराम महाराजांच्या वेषभूषेतील प्रकाश घोरपडे यांना पुष्पहार अर्पण करून तसेच राजेंद्र घावटे यांनी गायलेल्या ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे….” या तुकोबारायांच्या अभंगाने झाली. यावेळी जेष्ठ साहित्यिकांच्या काव्यपंक्ती, संतवचने आणि स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे फलक हाती घेऊन समाजप्रबोधन करण्यात आले. आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड, जेष्ठ शिक्षणतज्ञ शिवलिंग ढवळेश्वर यांनी या साहित्य प्रबोधन दिंडीचे शहरात स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.