Pimpri : सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं स्वागत; ‘बाप्पा’ माझ्यासाठी स्पेशल -सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा

एमपीसी न्यूज – आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. त्यामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरणांत बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. त्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इको फ्रेंडली गणपतीची सुंदर मूर्ती बनवली आहे. विशेष म्हणजे तिने स्वत: गणेश मूर्ती बनवली आहे. सोनालीने तिच्या घरीही इको फ्रेंडली मूर्ती बनवली आहे. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या या मूर्तीला कुंकवाने रंगविण्यात आले आहे. ही मूर्ती खूप मोहक झाली आहे.

याबाबत सोनालीने सांगितले, ”इतकी वर्षे आपण ऐकतो आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती टाळा व इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा. आमच्या घरी दरवर्षी इको फ्रेंडली बाप्पा विराजमान होतात. ही मूर्ती शाडूच्या मातीची असते हे माहित होते. पण रंग कोणते वापरले जातात हे माहित नव्हते. पण, पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने इको फ्रेंडली मूर्ती साकारण्याचे समाधान काहीच औरच असते.”

शाडूच्या मातीपासून बनवलेल्या या मूर्तीला कुंकवाने रंगविण्यात आले आहे. ही मूर्ती मोहक झाली असून आज पारंपारिक पध्दतीने सोनाली आणि तिच्या परिवाराने बाप्पाचं स्वागत करत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. लहानपणांपासून सांस्कृतिक होणा-या कार्यक्रमात भाग घेत असते. कलेचे दैवत म्हणून गणपती बाप्पाचे कौतुक करतो. कलाकारांसाठी गणेश हा पहिला दैवत असतो. गणपती बाप्पा माझ्यासाठी स्पेशल आहे. बाप्पाचे आर्थिक मंदी संपो. पूरग्रस्तांना लवकरात लवकर त्यांच्या घरात सुख शांती लाभो एवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. ही कलाकार म्हणून गणेशोत्सव नक्कीच महत्वाचा आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे.

गणपती बाप्पा सर्वांचा लाडके दैवत आहे. माझा बाप्पा, असे आपण म्हणतो. पण जेव्हा स्वतःच्या हाताने मूर्ती घडवतो तेव्हा खऱ्या अर्थाने बाप्पा आपला असतो. कारण, आपण तो घडवलेला व आकार दिलेला असतो. जीव ओतून ही मेहनत घेतलेली असते. त्यामुळे स्वतः बाप्पाची मूर्ती बनवताना एक वेगळा आनंद व समाधान मिळते. यापू्र्वी कधी मी मूर्ती बनवलेली नव्हती. पण, पहिल्यांदा बाप्पाची मूर्ती बनवताना खूप मजा आली. हा खूप निरागस अनुभव असल्याचे सोनाली म्हणाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.