Pimpri : कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करण्याच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे ‘अपना वतन’कडून पेढे वाटून स्वागत

एमपीसी न्यूज – आंतराष्ट्रीय न्यायालायने बुधवारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश पाकिस्तानला दिले. अपना वतन संघटनेच्या महिला ब्रिगेडच्या वतीने या निर्णयाचे स्वागत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पेढे वाटून केले. पिंपरी चौक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये पेढे वाटण्यात आले.

अपना वतन संघटनेने 2017 मध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुलभूषण जाधव यांच्या समर्थनार्थ मोठी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्यावेळेस पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला होता. तसेच भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान ,परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना हजारो सह्यांचे निवेदन देण्यात आले होते.

  • आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाने भारतीयांना अतिशय आनंद झाला असून या निर्णयाचे स्वागत अपना वतन संघटनेच्या वतीने पेढे वाटून करण्यात आले. यावेळी अपना वतन संघटनेच्या महिला शहराध्यक्षा राजश्री शिरवळकर, उपाध्यक्ष आरती कोळी, संघटक हेमलता परमार, सहसंघटक निर्मला डांगे, लक्ष्मी पांचाळ, संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर, लक्ष्मण पांचाळ, विशाल निर्मल, तौफिक पठाण, केशव बुडगळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश मिळाले. जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले.

  • कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून त्यांना एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावणी करून हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले असता जाधव यांच्याकडून पाकिस्तानने जबरदस्ती कबुली जबाब घेतल्याचा दावा भारताने केला होता.

याप्रकरणी सुनावणीत दोन्ही देशांनी बाजू मांडल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी 21 फेब्रुवारी रोजी राखून ठेवला होता, त्यानंतर आता पाच महिन्यांनी या प्रकरणात निकाल देण्यात आला. या खटल्याचे कामकाज दोन महिने चालले. वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी नाममात्र एक रूपया मानधन घेऊन या खटल्यात जाधव आणि भारताची बाजू मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.