BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: …. जेव्हा पार्थ पवार रिक्षातून प्रवास करतात

मतदारांशी साधला संवाद

1,916
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार विविध कारणांनी चर्चेत आहेत. पहिले भाषण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख तसेच ठेका धरणे अशा विविध कारणांवरून ते चर्चेत आहेत. पार्थ यांनी आज रिक्षातून प्रवास करत मतदारांशी संवाद साधला.

सध्या शहरात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू केला आहे. उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज दिवसभर पिंपरी मतदारसंघातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या.

सायंकाळी कासारवाडी पार्थ यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला. मतदारांशी संवाद साधला. रिक्षाचे सारथ्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले. यावेळी पिंपरीचे माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.