Pimpri: शिक्षण समिती सभापतीपदी कोणाची लागणार वर्णी?; सोमवारी होणार फैसला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी येत्या सोमवारी (दि. 5) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच सभापती कोण होणार? हे स्पष्ट होणार असून सभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक 9 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण समितीतील पहिल्या वर्षातील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ 8 जुलै रोजी संपला आहे. त्यानुसार रिक्त झालेल्या जागी पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपच्या चंदा लोखंडे, सागर गवळी, निर्मला गायकवाड, मनीषा पवार, शशिकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेच्या रेखा दर्शले अशा नऊ सदस्यांची 25 जुलै रोजी झालेल्या महासभेत निवड करण्यात आली आहे. समितीत भाजपचे वर्चस्व असल्याने सभापती, उपसभापती भाजपचा होणार हे निश्चित आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (दि.5) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत.

9 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी बारा वाजता महापालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.