Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालणार

माजी आमदार अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालण्याचे अभिवचन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आज प्रचारा दरम्यान पिंपरी न्यायालयात पिंपरी ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुनील कडुसकर, अॅड. संजय दातीर पाटील, ॲड. सुहास पडवळ, ॲड. बी. के. कांबळे, ॲड. किरण पवार, ॲड. मोनिका सचवानी, ॲड. सुजाता बिडकर, ॲड. जे. के. काळभोर, ॲड. महेश टेमगिरे, ॲड. रामचंद्र बोराटे आदी उपस्थित होते.

कोर्टाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुनील कडुसकर यांनी माजी आमदार अण्णा बनसोडे यांचे लक्ष वेधले. त्यावर बनसोडे यांनी पिंपरी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्याबाबत लक्ष घालण्याचे अभिवचन ॲडव्होकेट बार असोसिएशनला दिले. यावेळी बनसोडे यांचा पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. ॲड. रामचंद्र बोराटे यांनी सूत्रसंचालन केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like