Pimpri : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत उत्तम संबंध; महेशदादांना मंत्रीपद मिळणार ?

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे महेशदादांना मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकारणात सुरु झाली आहे. शहराला मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात दोन किंवा तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नव्हते. मुदतीत कोणीही सरकार स्थापन करु शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली होती. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या चर्चा सुरु असताना आज सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही आमदार फुटण्याची शक्यता आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत घनिष्ट संबंध आहेत. महेश लांडगे यांनी अजितदादांसोबत काम केले आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर देखील आमदार लांडगे यांनी अजित पवारांसोबत चांगले संबंध ठेवले. त्यांच्यावर थेट टीका केली नाही. त्यामुळे पवार यांचा देखील महेशदादांना मंत्री करण्यासाठी विरोध नसेल असे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1