Pimpri: कामगारनगरीतील इंडस्ट्रीच्या अडचणी सोडविणार; हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक

Will solve the problems of the industry in the working city; Meeting in Mumbai on hotel issue

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमध्ये पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र, पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार आहे. इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे प्रश्न समोर येत आहेत. त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला.

यावर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून यावेळी हॉटेल संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे अजित पवार सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य ‘करोना’ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वासही  पवार यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like