Pimpri : शहरात आणखी पाणी कपात होणार? व्हायरल मेसेजवर अधिकारी म्हणतात…!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून ( Pimpri ) एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असताना पुन्हा पाणीकपातीचा मेसेज व्हायरल झाला आहे. त्यामुळे आणखी पाणी कपात होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, हा मेसेज खोटा असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Pimpri : केंद्र सरकारच्या निगरानी समितीवर अविनाश वाघमारे यांची निवड

शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत असताना लाेकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहराची सुमारे 30 लाखांच्या घरात लाेकसंख्या आहे. शहरासाठी पवना धरणातून 510, आंद्रातून 100, भामा-आसखेड धरणाचे 167 असे 777 एमएलडी पाणी आरक्षित आहे. सध्या शहरवासियांना पवना धरणातून 510, आंद्रा धरणातून 75 आणि एमआयडीसीकडून 20 असे 605 एमएलडी पाणी देण्यात येत आहे. त्यानंतरही शहरातील विविध भागातील साेसायट्यांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

काय आहे व्हायरल मॅसेज?

‘ पवना धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यात कपात झाल्यामुळे मा शहर अभियंता पाणीपुरवठा विभाग यांचे सुचनेनुसार सर्व ठिकाणचा पाणीपुरवठा दिनांक 15/12/2023 पासून 15 मिनिटांनी कमी करण्यात येत आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरून मनपास सहकार्य करावे ही विनंती -पाणीपुरवठा विभाग ‘, असा मेसेज रात्रीपासून व्हायरल होत आहे.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, असा कोणताही निर्णय घेण्यात ( Pimpri ) आला नाही. व्हायरल मेसेज खोटा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.