Pimpri: आयुक्तांच्या कृपादृष्टीने ठेकेदारांची दिवाळी होणार गोड!; 128 कोटींची थकित बिले देण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावास स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कृपादृष्टीमुळे ठेकेदारांची दिवाळी गोड होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांची रखडलेली सुमारे 128 कोटींचे बिले देण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या विशेष सभेत आज (सोमवारी) मान्यता देण्यात आली. 313 कामांपोटी ठेकेदारांना सुमारे 128 कोटी अदा केले जाणार आहेत. बिले देण्यास निवडणुकीचा मुहूर्त साधल्याने आयुक्तांच्या भूमिकेविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाने 2018-19 या वर्षातील आणि त्यापूर्वीच्या चालू असलेल्या विकास कामांची बिले ठेकेदारांना देणे आवश्यक आहे. लेखा विभागाकडे मागील वर्षांच्या शिल्लक रकमेमधून सुमारे 169 कोटी 53 लाख रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. तथापि, लेखा विभागाने मागील शिल्लक रकमेतून सुमारे 128 कोटी 23 लाख रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. एकूण 313 विकासकामांची बिले देण्यासाठी सुमारे 127 कोटी 77 लाख रूपयांची आवश्यकता असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी आयुक्तांना कळविले.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार 313 विकास कामांपोटी सुमारे 127 कोटी 77 लाख रूपये ठेकेदारांना देण्यात येणार आहेत. यात रस्ते, रस्त्यांचे चर बुजविणे, खड्डे भरणे, खडीमुरुमीकरण, पेव्हींग ब्लॉक, फुटपाथ, स्मशानभूमी, दशक्रीया घाटाची दुरुस्ती, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, नालाबांधणी, नाला दुरुस्ती, इमारत रंगरंगोटी, मंडप व्यवस्था, उद्यान कामे आदीं कामे करणा-या ठेकेदारांचा समावेश आहे.

लेखा विभागाकडे उपलब्ध असलेल्या मागील वर्षाच्या शिल्लक रकमेतून ही बिले देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायीच्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुमारे 128 कोटींची बीले अदा केल्याने आयुक्तांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे.

‘अशी’ आहे क्षेत्रीय कार्यालय कामांची संख्या बिलाची रक्कम!
‘ब’ क्षेत्रीय कार्यालये 41 – 27,98, 69 हजार, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय 20 कामे 22,69 लाख 58 हजार 111, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय 18 कामे – 12 कोटी 10 लाख 26 हजार, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय 34 कामे – 34 कोटी 16 लाख 3943, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय 75 कामे – 6 कोटी 89 लाख 1771, ग क्षेत्रीय कार्यालय 19 कामे – 6 कोटी 22 लाख 52 हजार 839, ह क्षेत्रीय कार्यालय 40 कामे – 12 कोटी 85 लाख 24 हजार 873 आणि स्थापत्य उद्यान 66 कामे – 4 कोटी 83 लाख 36 हजार 150 असे एकूण 313 कामे – 127 कोटी 77 लाख 72 हजार 690 रुपये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.