Pimpri : पोलिसात तक्रार दिल्यावरून टोळक्याकडून महिलेला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – महिलेने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने महिलेला शिवीगाळ करत तिच्यासह तिचा जावई आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 16) नेहरूनगर येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

इंदुबाई भास्कर डोंगरे (वय 55, रा. मटण गल्ली, नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम बोराडे (वय 25, रा. पिंपरी), दिनेश (वय 26), सुरज घोडके (वय 24, रा. पिंपरी), उमेश सटवा सरवदे (वय 26), गणेश सटवा सरवदे (वय 30), महेश सटवा सरवदे (वय 22) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुबाई यांनी आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या रागातून आरोपींनी इंदुबाई त्यांच्या घरात नातेवाईकांसोबत गप्पा मारत असताना त्यांच्या घरावर दगड मारले. याबाबत इंदुबाई यांनी आरोपींना जाब विचारला असता ‘तू आमच्या नावाची पोलीस तक्रार केली आहे का?’ असे म्हणत शिवीगाळ केली. ही भांडणे सोडविण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई आले असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.