Pimpri : क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून महिलेला बॅटने मारहाण

एमपीसी न्यूज – घरात आलेला क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून 4 ते 5 जणांनी महिला व ( Pimpri) तिच्या पुतण्याला बॅटने मारहाण केली आहे.ही घटना रविवारी (दि.19) पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडली आहे.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून ओंकार सुतार, प्रथमेश बोंडे, श्रेयस राणे, निखिल थिटे, फुलारी इरान सर्व रा.पिंपरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangavi : जुन्या भांडणाच्या रागातून एकाला कोयत्याने मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळत असताना आरोपी मुलांचा बॉल 4 वेळा फिर्यादी यांच्या घरात गेला. त्यांच्या या सतत च्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी बॉल देण्यास नकार दिला.
याचा राग येवून 5 ही जणांनी फिर्यादी यांना हाताने व बॅट ने मारहाण केली.भांडणे सोडविण्यासाठी आलेला फिर्यादी यांच्या पुतण्याला ही बॅट व स्टंप ने मारहाण करत जखमी केले. यावरून पिंपरी पोलिस ठाण्यात ( Pimpri) गुन्हा दाखल केला आहे.