BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला. तसेच तिच्याकडून पैसे आणि 20 तोळे सोन्याचे दागिने घेतले. घेतलेले पैसे आणि दागिने परत न देता महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजेंद्र पर्वत ठाकरे (वय 52, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. मागील पाच वर्षांपासून या आमिषाने त्याने पीडित महिलेशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. पीडित महिले नावे एका बँकेत एक लाख रुपयांची एफडी आहे. त्यावर राजेंद्र याने 70 हजार रुपयांचे कर्ज काढण्यास सांगून ते पैसे घेतले.

तसेच वेळोवेळी महिलेकडून 20 तोळे सोन्याचे दागिने घेतले. सर्व मागण्या पूर्ण करूनही राजेंद्र याने महिलेशी विवाह केला नाही. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारले असता त्याने त्यांच्या या प्रकाराबाबत घरी सांगणार असल्याची धमकी दिली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलिसांनी राजेंद्रला अटक केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3