Pimpri: बस प्रवासातून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज-  खाली ठेवलेल्या बागेतून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले (Pimpri)आहेत. ही घटना मंगळवारी (दि.14) मलकापूर ते वल्लभनगर पिंपरी, एसटी बस मध्ये घडली आहे.

याप्रकरणी महिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून(Pimpri) पिंपरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Sangavi: टास्कच्या बदल्यात 14 हजार देऊन महिलेकडून लुबाडले साडे अकरा लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व त्यांची पती हे मलकापूर ते वल्लभनगर पिंपरी असा एसटी बस प्रवास करत होते. यावेळी त्यांनी त्यांची बॅग हे त्यांच्या सीट खाली ठेवली होती. यावेळी कशाच्या तरी साहाय्याने बॅग कापून बॅगमधील 2 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरांनी चोरले.

पिंपरी येथे उतरल्यानंतर ही बाब लक्षात येताच फिर्यादीने पिंपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.