Pimpri: कौतुकास्पद! महापालिकेतील मजूर महिला झाली बारावी पास

सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते शिला सूर्यवंशी यांचा गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसचिव विभागातील मजूर महिलेने नोकरी करून बारावीच्या परिक्षेत यश मिळविले आहे. बारावीत 55 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या महिलेचे शिला लक्ष्मण सूर्यवंशी असे नाव आहे. शिक्षणाविषयी असलेल्या जिद्दीबद्दल त्यांचे महापालिकेत कौतुक होत आहे.

या यशाबद्दल स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते शिला सूर्यवंशी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नगरसचिव उल्हास जगताप उपस्थित होते. बारावीचा निकाल आज लागला. त्यात महापालिकेतील मजूर म्हणून नोकरी करत असलेल्या शिला सूर्यवंशी यांनी कुटुंब सांभाळत यश मिळविले आहे.

  • बारावीच्या परीक्षेत 55 टक्के गुण मिळविले आहेत. सूर्यवंशी या मूळच्या जळगावच्या असून पिंपरीतील, खराळवाडीमध्ये त्या राहतात. त्यांनी जळगाव येथून 13 वर्षांपूर्वी दहावीची परिक्षा दिली होती. मात्र, पुढे लग्न झाल्यानंतर त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले होते.

त्यानंतर लग्न होऊन पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर काही वर्षांत पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सूर्यवंशी यांच्यावर आली. त्यांना अनुकंपा तत्वावर महापालिकेत मजूर या पदावर नोकरी मिळाली.

  • सध्या नगरसचिव कार्यालयात शिपाई म्हणून काम पाहत आहेत. त्यांना दोन अपत्ये असून मोठी मुलगी सातवीत, मुलगा तिसरीत शिक्षण घेत आहे. मुलांची जबाबदारी आणि नोकरी करत शिला सूर्यवंशी यांनी चिंचवड येथील फत्तेचंद जैन शाळेत प्रवेश घेऊन बारावीची परिक्षा दिली. त्या 55 टक्के गुण बारावी उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महापालिकेत कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.