Pimpri : ‘वंडरलँड स्कूल’चे वार्षिक स्नेहसंमेलनात नृत्य, नाटक, देशभक्तीपर गीतांसह, पोवाड्याचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – ओम प्रतिष्ठान संचलित ‘वंडरलँड स्कूल’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी बालकलाकारांनी नृत्य, नाटक, फॅशन शो, पोवाडा, देशभक्तीपर गीत यांचे सादरीकरण केले.

हे वार्षिक स्नेहसंमेलन खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार,’ एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, ‘गणराज टूर्स’च्या संचालिका अनिता शिंदे, नामवंत डॉक्टर पराग पाटील, सामाजिक कार्यकर्ते हुसेन यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.

वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे एक मोठा उत्सवच जणू शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या कलाकारांचे सुप्त गुण व्यक्त करण्याचे माध्यम. यामध्ये शाळेची भावी प्रगतीची रूपरेखा प्रस्तुत करण्याचा दिवस होय. या उत्सवातून मुलांची बहुमुखी प्रतिभा प्रकट होतेच. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते, असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभा बोराडे, अक्षय पिंपले यांनी केले. बालकलाकारांनी कार्यक्रमामध्ये नृत्य, नाटक, फॅशन शो, पोवाडा, देशभक्तीपर गीत यांचे सादरीकरण केले. सर्व नृत्यांची कोरियाग्राफी तेजस यांनी केली. संस्थेच्या अध्यक्षा वनिता सावंत यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.