BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : थकीत पगाराच्या मागणीसाठी आर्मी डेअरी फार्ममधील कामगारांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – दोन महिन्यांपासून थकीत पगाराच्या मागणीसाठी पिंपरी डेअरी फार्म येथील लष्कर गोशाळेतील कंत्राटी कामगारांनी बुधवारी (दि. 21) आंदोलन केले. 

पिंपरी येथील डेअरी फार्ममध्ये लष्कराची गोशाळा आहे. गोशाळेत सुमारे 1 हजार 700 जनावरे असून 200 कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. दूध काढणे, साफसफाई आणि देखभाल असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. तसेच पीएफ ईएसआय आणि पगार पावतीही देण्यात येत नाही.

त्यातच ठेकेदाराने कामगारांचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा पगार राखडवला आहे. त्यामुळे कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. कामगारांनी काम थांबवून फार्मच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. तसेच घोषणाबाजी करत निर्दर्शने केली. थेट प्रशासनाने चर्चा करून लवकरात लवकर पगार करावा. तसेच इतर सोसयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

.