Pimpri: रस्ते सफाईच्या नवीन निविदेत कामगारांचा विचार करावा- सुलभा उबाळे

Pimpri: Workers should be considered in new tender for road cleaning- Sulbha Ubale कामगाविरोधी ही निविदा रद्द करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यामुळे निविदा रद्द करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महपलिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याची 742 कोटींच्या निविदा कोणाला तरी आर्थिक फायदा व्हावा म्हणून काढली होती. कामगार बेरोजगार होणार होते. त्याविरोधात आम्ही आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत बेकायदेशीर निविदा रद्द झाली आहे. आता नवीन निविदा काढताना कामगारांचा विचार करावा. कामगारांना केंद्रबिंदू ठेवूनच निविदा काढावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

पालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याची 742 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा प्रक्रियेदरम्यान नियमांचे सर्रासपणे उल्लंघन झाले होते. या निविदेत सफाई कामगारांचा विचार केला नव्हता. त्यांच्यावर अन्याय होणार होता. बेरोजगारीची कु-हाड कोसळणार होती.

ही निविदा वस्तुस्थितीला धरुन नव्हती. पूर्ण अभ्यास न करता केवळ कोणाला तरी आर्थिक फायदा व्हावा. म्हणून ही निविदा काढली होती. त्यामुळे कामगारविरोधी ही निविदा रद्द करण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यामुळे निविदा रद्द करण्यात आली आहे.

कोरोनाच्या महामारीत सफाई कामगार जीवावर उधार होऊन काम करत आहेत. काही कामगारांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्यांची हजेरी लावून त्यांना पगार देण्यात यावा. कोरोनाच्या काळात कामगारांनी सफाई काम केले. त्यामुळे शहरातील सर्व कामगारांना एक महिन्याचा पगार देण्यात यावा. खरे देवदूत हे सफाई कामगारच आहेत. त्यांचा महापालिकेने गौरवही करावा.

यापुढे निविदा काढताना कामगारांना केंद्रबिंदू ठेवूनच निविदा काढल्या जाव्यात. स्वच्छ, सुंदर शहरामध्ये कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. याचा विसर पदाधिकारी आणि प्रशासनाला पडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.