Pimpri: मनसे चित्रपट सेनेची शहर कार्यकारिणी जाहीर

संघटकपदी प्रज्ञा पाटील, दत्ता घुले

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिंपरी-चिंचवड शहर चित्रपट सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शहर संघटकपदी प्रज्ञा पाटील आणि दत्ता घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश परदेशी यांच्या सहकार्याने चित्रपट सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

शहर संघटकपदी प्रज्ञा पाटील आणि दत्ता घुले, उपसंघटकपदी तुकाराम शिंदे, दीपक भालेराव, प्रसाद खैरे, सचिव शिवनाथ दिलपाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्रात अभिनेत्यापासून ते निर्मात्यापर्यंत जाणावणा-या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ही संघटना काम करणार आहे. अनेक कलाकार पिंपरी-चिंचवड शहरात आहेत.

त्यांच्या कलेला दाद मिळत नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील सर्वांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.