Pimpri : सूरराज गुरुकुलतर्फे ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क ‘ विषयावर कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – सूरराज गुरुकुल यांच्या तर्फे कलाकारांसाठी (Pimpri) चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विशेषतः कलाकारांसाठी शास्त्रीय आणि सुगम संगीत बरोबरच इतर आवश्यक आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर म्हणजेच ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क ‘ यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका रिता शेटीया यांनी या विषयावर ध्वनिफीत, गेम्स आणि काही ॲक्टिविटी च्या सहायाने नेतृत्व गुण आणि टीम वर्क कोणत्याही क्षेत्रात किती उपयुक्त आहे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये नेतृत्व गुण , महत्व 80 वयोगटातील शिबीरार्थींनी सहभाग घेतला.

कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या श्वेता अगीवले म्हणाल्या, मी हा विचारच केला नव्हता की नेतृत्व या विषयावर कार्यशाळा होऊ शकते. मी जे कार्य करते आहे, ते नेतृत्वाच्या अंतर्गत येते हे मला कार्यशाळेमुळे समजले. लोणावळ्याची आठवी इयत्तेत शिकणारी मृण्मयी म्हणाली , मला भविष्यात नक्कीच या कार्यशाळेचा उपयोग होईल. पुण्याची देविका देशपांडे म्हणाली, ‘फन अँड लर्न’ ॲक्टीविटीमधून टीम वर्क आणि नेतृत्व गुण याविषयीचे योग्य ज्ञान आम्हाला (Pimpri) झाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.