Pimpri : लहानपणीचे खेळ खेळून महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – मोबाईल आणि डिजीटल युग यामुळे विसर पडलेल्या बालपणाचे जुने खेळ खेळून लायनेस क्लब व सखी सहेली महिला प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी विट्टी दांडू, दोऱ्यावरच्या उड्या, लंगडी, सागर गोटे, गोट्या कंच्या, शिवणापाणी असे अनेक खेळ खेळण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे आयोजन लायनेस क्लब सदस्या व सखी सहेली महिला प्रतिष्ठानच्या आध्यक्षा नंदा फुगे तसेच लायनेस क्लब मट्रोपोलिस, अ्कटिवच्या अध्यक्षा भाग्यश्री मोरे,व अध्यक्षा दिपा जाधव यांनी केले होते. याप्रसंगी सर्व महिलांनी स्वतः आनंदी आणि निरोगी राहण्याची प्रतिज्ञा केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या विवीध खेळांच्या स्पर्धांमध्ये घर काम करणाऱ्या महिला, सफाई कामगार महिला, लायन्स व लायनेस सदस्या, सखी सहेली प्रतिष्ठान सदस्या यांच्यासह सर्व महिलांनी उत्सफूर्त भाग घेतला.

 

यामध्ये स्पर्धांमध्ये अंजूम सय्यद, सीमा विचारे, अनिता कांबळे, बीना दत्त, प्रिया पाल, लक्ष्मी अयर, सविता भोसले, सावित्री बागोडी, पल्लवी फुगे, तारा गायकवाड, प्रियंका, विद्या, संगीता यांनी बक्षिसे पटकवली.  हे खेळ खेळून खरेच आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण आली, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदा फुगे यांनी केले तर लायनेस भाग्यश्री मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.