Pimpri : शहरात जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक महिला दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताने स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडच्या वतीने देहूरोड येथील गेथसमेनी वृद्धाश्रमामधील निराधार, वयोवृद्धांना कपडे, जीवनावश्यक वस्तू, बिस्किट पॅकेट्स प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, अंजली ब्रम्हे, किर्ती नाईक, जयश्री वीरकर, रागिणी मुदलीयार आदींच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी अध्यक्षा निर्मला जगताप म्हणाल्या, आज लहान मुलांचे वाढदिवसाला त्यांचे आई-वडील हौसेने खर्च करतात. मानवतेच्या भूमिकेतून नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी, दानशूर व्यक्तिंनी, समाजलक्षी उद्योगसमूहांनी मानवतेच्या येथील वृद्घाश्रमास भेट द्यावी, येथील निराधार, वयोवृद्ध आजी-आजोबा समान असणार्‍यांच्या समवेत पालकांनी त्यांच्या मुलांच्या वाढदिवस येथे साजरा करावा. त्यामुळे येथील वृध्दाश्रमातील वयोवृद्धांना विशेष आनंद होईल. जे वयोवृध्द आपल्या नातेवाईक, रक्ताच्या कुटुंबीयांपासून आज दुरावलेले आहे. त्यांना येत असलेली आपल्या रक्तातील नात्या-गोत्यांची आठवण काही प्रमाणात दूर होईल. आज त्यांना आधाराची गरज आहे. आपण देखील त्यांच्या कुटुंबातीलच एक घटक समजून म्हणून आपल्या लहान मुलांचा वाढदिवस या वृद्धाश्रमात साजरा करावा, असे आवाहन करीत आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना वृद्धाश्रमाचे संचालक संतोष जॉय यांनी केले, तर आभार ज्युली जॉय यांनी मानले.

  • जागतिक महिला दिनानिमित्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २४ विधवा, अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांना पेन्शन मंजूरीची पत्रे आज पिंपरी येथे वाटण्यात आली. आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते ही पत्रे वाटप करण्यात आली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा-१४, अपंग-०५, वयोवृद्ध-०५ असे एकूण २४ जणांचा पेन्शन मंजुरी झालेल्यांमध्ये समावेश आहे.

यावेळी माजी नगरसेवक हिरामण पवार, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष नितीन घोलप, विजय ओव्हाळ, गणेश लंगोटे, महेंद्र सोनवले आदी उपस्थित होते. लवकरच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे कार्यालय आकुर्डी येथील तहसील कार्यालयात स्थलांतरीत होणार असल्याची माहिती नितीन घोलप यांनी दिली.

  • जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा प्रतिष्ठानतर्फे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 7 मार्च रोजी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात येथे करण्यात आले होते. यावेळी महिलांनी विविध कलागुणदर्शन घडवले यामध्ये महिलांच्या विषयावरील गाणी नृत्य याचे सादरीकरण झाले. यामध्ये स्वानंद महिला मंडळ, जानकीदेवी बजाज समाजसेवा केंद्र यांनी सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी, भाग्यश्री कुलकर्णी, माधुरी ओक, जानकीदेवी बजाज सेवा केंद्राच्या अध्यक्षा स्वाती देशपांडे, सुरेखा कटारिया, स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी शुभांगी शिंदे फलटणकर यांनी सादर केलेल्या “मी सावित्री बोलतेय” या एकपात्री नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी महिला दिनांवर आधारित 24 कवयित्रीनी कवितांचे सादरीकरण केले. यामधे वैशाली मोहिते माधुरी विधाटे, संगीता भंडारे, शिल्पा कुलकर्णी, सुनीती लिमये, भारती सोनवणे, राधाबाई वाघमारे आणि इतर असे एकूण 24 कवयिञींनी आपल्या कविता सादर केल्या.

  • यावेळी सुरेश कंक, प्रदीप गांधलीकर, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, बाबू डिसोजा, अशोक कोठारी, अंतरा देशपांडे, उज्वला केळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन मानसी चिटणीस व समृद्धी सुर्वे यांनी केले तर, आभार प्राजक्ता रुद्रावार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन करण्यासाठी नंदकुमार मुरडे, दिनेश भोसले, वृषाली वजरीनकर, ज्ञानेश्वर भंडारे यांचे सहकार्य लाभले.

नेहरु युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नंदकिशोर कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना जिल्हा पातळीवर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेली भारत सरकारचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन 500 महिलांना गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा नंदकिशोर सभागृह येथे झाला.

  • यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहूल जाधव, नेहरु युवा केंद्राचे संचालक यशवंत मानखेडकर, नगरसेविका सुमन पवळे, महिला संघटिका सुलभा उबाळे. नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले. कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते आदी उपस्थित होते. यावेळी वसुधा वडके (कला), वैशाली भुते (पत्रकार), सुषमा जोगळेकर (गायन), डॉ. राधिका शहा (वैद्यकीय), अंजना सोनवणे, अरुणा देऊस्कर (शैक्षणिक), सुहासिनी येवलेकर, इंदुमती वाघमारे, शैलजा पवाक, कमल थिगळे (सामाजिक), आरती शिंदे, हुल्लास छेडा (व्यवसाय) या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन शोभा कुलकर्णी यांनी केले.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त पुणे ते दिल्ली अशा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले, “सशक्त नारी से ही बनेगा सशक्त समाज !!” असा संदेश घेऊन ही सायकल रॅली पुढील १५ दिवसात १५ शहरातून १५०० किमी चा प्रवास करून दिल्लीपर्यंत जाणार आहे. दिल्लीमध्ये जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. या रॅलीमध्ये २५ सायकलपटू सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांचा सहभाग आहे. सकाळी ६:३० वा शंख वादनाने या रॅलीची सुरुवात झाली.

  • यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८, ९ आणि १० मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले. महिलांना सक्षम करून त्यांच्यासाठी नेहमी मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी केले. आनंद हास्य योगा क्लबच्या सदस्या संध्या माशाळकर यांनी यावेळी “स्त्री”शक्तीचे महत्च सर्वांना पटवून दिले. स्त्रीला प्रोत्साहन द्या, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, पी.के.स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, स्पर्श फौंडेशनचे संस्थापक भूपेंद्र सिंग राठोड, रोटरी क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षा वासवी मुळे, कविता भिसे, उषा वाकचवरे, राजू काटे, बाळू काटे, बच्छराज शर्मा, रामप्रकाश गुलाब मेटे वासनकर, रमेश वाणी, विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाषचंद्र पवार, आरएसएस महासंघाचे सदस्य मीनाक्षी देवतारे, कांचन काटे, सुवर्णा काटे, मंदा वाळके, विकास काटे, केशव मुजुमदार, ऋषिकेश होणे, विवेक भिसे, आनंद हास्य योगा क्लब चे सर्व सदस्य, नवचैतन्य हास्य क्लबचे सर्व सदस्य, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, पिंपळे सौदागरचे सर्व सभासद आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार सायकलपटू अनिल पिंपळीकर यांनी केले.

  • ८ मार्च जागतिक माहिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या वतीने संस्थेतील महिलांसाठी पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आदेशपत्रकाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर उद्योग व्यवसायासंदर्भामध्ये किरण गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या अध्यक्षा सौ.सारीकाताई संजय भेगडे यांनी संस्थेच्या माध्यमातून होणारे उपक्रम व योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका व विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका विभावरी दाभाडे, कल्याणी ठाकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्षा सारिका भेगडे, उपाध्यक्षा सायली बोत्रे, सचिव सुमित्रा जाधव, खजिनदार सीमा देशमुख, सदस्या व नगरसेविका शोभाताई भेगडे, विद्या काशीद, तनुजा भेगडे, शोभा साठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित्रा जाधव आणि सायली बोत्रे यांनी केले. आभार तनुजा भेगडे यांनी मानले.

या कार्यक्रमामध्ये पाककला स्पर्धेमध्ये तीन क्रमांक, रांगोळी स्पर्धेमध्ये तीन व मेहंदी स्पर्धेमध्ये तीन क्रमांक काढले व उत्तेजनार्थ बक्षीसही प्रत्येक स्पर्धेमध्ये देण्यात आले. पाककला स्पर्धा : प्रथम क्रमांक : अश्विनी राजपूत, द्वितीय क्रमांक : जानवी पवार, तृतीय क्रमांक : नेहल पारीख, उत्तेजनार्थ : वैशाली लालगुडे. रांगोळी स्पर्धा : प्रथम क्रमांक : उषा मोरे, : द्वितीय क्रमांक : अर्चना जाधव, तृतीय क्रमांक: ज्योती साळुंके, उत्तेजनार्थ : स्वाती बेंद्रे. मेहंदी स्पर्धा – प्रथम क्रमांक : ज्योती साळुंके, द्वितीय क्रमांक : प्रिया कुंभार, तृतीय क्रमांक : प्रतीक्षा भेगडे, उत्तेजनार्थ : भाग्यश्री कदम.

  • जागतिक महिला दिवसानिमित्त मधुकर बच्चे युवा मंच वतीने गरजू महिला,मुलींना ड्रेस व साडी वाटप करण्यात आले. आकुर्डी रेल्वे स्टेशनपासून सुरवात करण्यात आली दुपारी एक वाजेपर्यंत पर्यंत दापोडीपर्यंत प्रत्येक चौकातील सिग्नल व रेल्वे स्टेशनवर जाऊन ड्रेस व साडी वाटप करण्यात आली. विशेष म्हणजे चिमुकल्या मुलींसाठी फ्रॉक व कुर्ता देण्यात आला.

महाराष्ट्र महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. यास पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा यांनी मोलाचे योगदान दिले. भाजपा रोजगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सौरभ शिंदे सामाजिक कार्यकर्ते मदन चौधरी, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, अभिजित पवार आदींनी या उपक्रमांत सहभाग घेतला. या उपक्रमासाठी काही लोकांनी स्वताहून मदत केली गरिबांच्या गरजेचा व वेगळा महिला दिन उपक्रम म्हणून सर्वानी एकत्र येऊन हे विशेष नियोजन केले.

  • पिंपळे सौदागर हे स्मार्ट आहेच त्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणमुक्त पिंपळे सौदागरसाठी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि नगरसेविका शितल नाना काटे यांनी आज महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल नाना काटे, नगरसेविका उषा संजोग वाघेरे यांच्या हस्ते ई-स्कूटर सेवेला प्रारंभ करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हिरो लिप कंपनी यांच्या विद्यमाने स्मार्ट सिटी अंतर्गत प्रथमच पिंपळे सौदागर येथे ई-स्कूटर सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

ही स्कूटर पर्यावरणपूरक आहे यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्थानिक कामासाठी आणि स्थानिक प्रवासासाठी या ई-स्कूटरचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा. पर्यावरणाला हातभार लावावा, असे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे आणि नगरसेविका शितल नाना काटे यांनी केले. यावेळी स्कूटर च्या लीप कंपनीचे हार्दिक रिजवाणी यांनी या स्कूटरच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली.

  • ही स्कूटर अॅण्ड्रॉईड अॅप चालू किंवा बंद करता येते. ई-स्कूटर चालविण्यासाठी प्रथम १५ मिनिटे फ्री राईड असेल,त्यानंतर प्रत्येक मिनिटाला १.५० रुपये आकारले जातील. पैसे अदा करण्यासाठी युपीआय अॅप्सचा वापर करता येतो.

ई-स्कूटर विजेवर चालत असल्यामुळे बॅटरी४ ते ५ तास चार्ज करावी लागते. एकदा चार्ज केल्यानंतर ६० किलोमीटर पर्यंत चालवता येते. ई-स्कूटरची गती २५ किलोमीटर प्रती तास आहे. याचा चार्जिंग पॉइंट गणेशम सोसायटी जवळील BRT पार्किंग मध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती रिजवाणी यांनी दिली.

यावेळी लेखिका अनिता धनंजय भिसे यांनी लिहिलेली पुस्तके अमेझिंग अमेरिका,चौकट शोध सुखाचा,शब्दांची फुले,अॉसम ऑस्ट्रेलिया तसेच अनेक पुस्तके प्रकाशित झालेले आहेत,तसेच त्यानी बी.एस्सी,डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट,डी.सी.एम,.एम.ए.अशा अनेक पदव्या मिळविल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वैशाली अरणकल्ले यांची पिंपरी चिंचवड शहर स्वयं रोजगार व बचत गटाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा पुष्पा संचेती, मीनाक्षी उंबरकर, तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित देशातील 50 कर्तबगार महिलांची रेखाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनात पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भरविण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ८) आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार व पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्त्या कुंदा संजय भिसे, उद्योगपती कुंदन ढाके, निता परदेशी, निर्मला जगताप, संदीपान साबळे, आदी यावेळी उपस्थित होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित देशातील ५० कर्तबगार महिलांची रेखाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती.

या प्रदर्शनामध्ये राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, मदर तेरेसा, सिंधूताई सपकाळ, सुप्रिया सुळे, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज, पंकजा मुंडे, सायना नेहवाल, सानिया मिर्झा आदी एकूण 50 कर्तबगार महिलांची रेखाचित्रे येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन सोमवार (दि. 11) पर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्ताने बिजलीनगर येथील मातृसेवा वृध्दाश्रम येथे महालक्ष्मी फांऊडेशन प्रणित संकल्पसिध्द महिला बचतगटाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. यावेळी श्रीमती सिंधु नाईक, सुवर्णा सुर्वे, सुनीता जयवंत, वंदना हारवडे, सुरेखा वाघ, प्रतिभा वहाळकर, अरुंधती चोरघडे,ऊज्वला देशमुख,वीरश्री सुरवसे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन रजनी वाघ यांनी केले.

कदम फाऊंडेशन यांच्या वतीने शुभदा कदम हिच्या स्मरणार्थ दिघी आणि परिसरातील ज्यांना फक्त मुली आहेत अशा 208 दाम्पत्यांचा ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत सन्मान करण्यात आला. शुभदा कदम हिचे तीन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले होते. समाजातील ज्या मुलींना शिकण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक परिस्थिती अभावी ज्या मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा मुलींना येत्या शैक्षणिक वर्षात दत्तक घेऊन शिक्षणाचा खर्च उचलण्याचा फौंडेशनचा मानस आहे.

यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, कल्पना आढळराव पाटील, नगरसेविका हिराबाई नाणी घुले आणि निर्मला गायकवाड, नगरसेवक श्री.लक्ष्मण उंडे, विकास डोळस, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योजक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील दिगज्ज देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन संतोष बबनराव कदम आणि शीतल संतोष कदम यांच्यातर्फे करण्यात आले तर संयोजन शुभम कदम, कैलास कदम, शैलेश कदम, आकाश कदम आणि ऋषिकेश तायडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.