Pimpri : पिंपरी भाजी मंडई येथील अतिक्रमण कारवाई चुकीची – प्रल्हाद कांबळे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाने भाजी विक्रेत्यावर पिंपरीत कारवाई करण्यात आली. याबाबत विचारणा केली असता करोनाबाबत सुचना देवूनही या ठिकाणी भाजी घेण्यासाठी गर्दी केली जात असल्याने अतिरीक्त आयुक्त अजित पवार यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली असे सांगितले आहे. करोनामुळे शहरात संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापण कायदा लागू असताना अतिक्रमण कारवाईस परवानगी कशी दिली, तसेच केलेली कारवाई अत्यंत चुकीची असून, आपण याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे टपरी पथारी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले.

शासनाची जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला विक्री करण्यास परवानगी आहे. उलट जीवनावश्यक वस्तू विक्री बंद करु नये. एवढेच काय तर मार्केटयार्ड मध्ये आलेला भाजीपाला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी देण्यात येत आहे. असे असताना पिंपरी मंडई येथे झालेली कारवाई अन्यायकारक आहे. या बाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता गर्दी झाल्यामुळे कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे कांबळे यांनी सांगितले.

कारवाई करण्यात आलेल्या टपरी, पथारीधारकांचा फेरीवाला धोरणांतगर्त सर्वे झाला आहे. महापालिकेकडून त्यांना परवाना देखिल देण्यात आला आहे. पिंपरी विभागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू फळभाजी पुरवणे हे प्रशासनाचे काम असून यासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी मोकळे मैदान उपलब्ध करून दिले जात असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.