Pimpri : यशस्वी’ संस्थेच्या आय आय एम एस च्या विद्यार्थ्यांच्या ‘मार्केटनामा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या एमबीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मार्केटनामा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एमबीएच्या क्रमिक अभ्यासक्रमामध्ये शिकविण्यात येणाऱ्या नफा-तोटा, विक्री कौशल्य, मार्केटिंग कौशल्य आदी बाबी प्रत्यक्ष अनुभवता यावा म्हणून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यानी विविध वस्तूंचे स्टॉल प्रदर्शित केले. यामध्ये दिवाळी फराळ, केक, कटलेट, वडापाव, प्रिंटेड कप, प्रिंटेड टी शर्ट आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. अशाप्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बाजारपेठेचे ज्ञान, ग्राहकांची मानसिकता याबाबी प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येतात असे मत यावेळी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी व्यक्त केले.

यावेळी उत्कृष्टपणे स्टॉलची मांडणी करणाऱ्या पुजा साळवेकर, योगिता मुळ्ये, गणेश राख, श्रेया जाधव व जयसिंग परदेशी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून डॉ. वंदना मोहांती, प्रा. सारंग दाणी, आदिती चिपळूणकर यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.